"महारेरा" बद्दल थोडक्यात
बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीला चाप लागावा व सर्वसामान्यांना रास्त दरात घरे मिळावी यासाठी राज्य सरकारने स्थावर संपदा
( विनियमन व विकास) अधिनियम, २०१६ अंतर्गत 'महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) स्थापना केली आहे.
"महारेरा" ची उद्दीष्टे:-
• महारेरा हे महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्राचे नियमन करते. खुल्या बाजारात सदनिका विक्री करण्यापूर्वी प्रत्येक विकासकाला त्याचे प्रस्तावित आणि चालू असलेले दोन्ही प्रकल्प महारेरामध्ये नोंदणीकृत करणे आवशयक आहे.
• नोंदणी करतेवेळी, विकासकाने बांधकाम प्रकल्पाबद्ल संपूर्ण माहिती जाहीर करणे आवश्यक आहे.
• बांधकाम प्रकल्पाबद्दलच्या जाहिरातीमध्ये महारेरा विशिष्ट नोंदणी क्रमांक नमूद असणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या तपशिलाची पडताळणी
https://maharera.mahaonline.giv.in
या संकेस्थळावर केली जाऊ शकते.
• विकासकाकडून दिलेले सर्व तपशील महारेराच्या संकेस्थळावर जनतेच्या माहितीकरिता उपलब्ध होतात.
• खरेदीदार विकासकाने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी महारेरा संकेस्थळाला भेट देऊशकतो. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांची माहिती या संकेस्थळावर असेल.
• इच्छुक खरेदीदार ठिकाण किंवा विकासकाचे नाव किंवा सदनिकाचा प्रकार इत्यादिनुसार महारेरा संकेतस्थळावर प्रकल्प शोधू शकतो.
• मंजूर प्रकल्प योजना, आराखडा, इमारत आराखडा, प्रारंभ प्रमाणपत्र, सदनिकांची वैशिष्ट्ये, सोयीसुविधा, विकास कार्याचा आराखाडा , इत्यादी दस्तवेज आणि वाटपपत्रचे स्वरूप, विक्री करारपत्र आणि कन्व्हेयन्स डीड इत्यादी कागद पत्रे इच्छुक खरेदीदार तपासू शकतो.
• खरेदीदाराकडून वसूल केलेल्या रक्कमेपैकी ७०% रक्कम स्वतंत्र प्रकल्प खात्यात जमा करणे आवश्यक आहे. अभियंता, आर्किटेक्ट आणि लेखापाल यांनी प्रमाणित केल्यानंतर ही रक्कम काढता येईल.
• महारेरा च्या तरतुदींचे पालन न केल्यास कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे.
• अधिक माहितीसाठी https://maharera.mahaonline.gov.in

No comments:
Post a Comment