Tuesday, 9 January 2018

जमीन खरेदी करण्यापुर्वी घ्यावयाची काळजी .....

जमीन खरेदी करण्यापुर्वी घ्यावयाची काळजी .....

      आजही जमीन खरेदी विक्रिचा व्यवहार गृप्तपणे व झटपट करण्याचा दोन्ही पक्षाचा हेतु असतो .आपल्याला जमिनीचा चांगला भाव मिळत आहे , जमीन घेणारी व्यक्ती व्यवहारात नवीन आहे त्यामुळे त्याला हक्क व वारस यांची फारशी माहिती नाही यामुळे घाई करणे व विषय गोपनीय ठेवणे उचित अशा विविध कारणानी जमीन विक्रिचा व्यवहार गोपनीय राहतो. प्रत्यक्षात जमिनीच्या मालकी हक्काची नोंद होते त्यावेळी अडचणी निर्माण होतात किंवा होण्याचा संभव असतो .

भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये म्हणुन खरेदी करण्यापूर्वी खालील बाबी तपासाव्यात .

• जमिनीचा चालु ७ /१२ काढुन त्यावर मालकांची नावे तपासावीत.

• सदर जमीन विक्री करणाऱ्याच्या नावावर कशी झाली आहे . या साठी किमान 3० वर्षापासुनच्या सर्व फेरफार व नोंदी तपासाव्यात .

• जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का ?

• जमीनीच्या इतर हक्कामध्ये बॅंक , सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का ?

• जमीन ही प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का ?

• जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्यक्ष त्याब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का ?

• सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर , झाडे , इत्यादीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी .

• जमिनीच्या इतर हक्कामध्ये अन्य व्यक्ती चे हक्क आहेत का ?
जमिनीच्या व्यवहामुळे इतर लागु असलेल्या कायद्याला भंग होतो का ?

• पाटपाणी पाइपलाइन, वहिवाट रस्ता, झाडे इत्यादी हक्क कसे आहेत.

Wednesday, 3 January 2018

"महारेरा" बद्दल थोडक्यात

"महारेरा" बद्दल थोडक्यात

बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानीला चाप लागावा व सर्वसामान्यांना रास्त दरात घरे मिळावी यासाठी राज्य सरकारने स्थावर संपदा
 ( विनियमन व विकास) अधिनियम, २०१६ अंतर्गत 'महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) स्थापना केली आहे.

"महारेरा" ची उद्दीष्टे:-

• महारेरा  हे महाराष्ट्रातील बांधकाम  क्षेत्राचे नियमन करते. खुल्या बाजारात सदनिका विक्री करण्यापूर्वी  प्रत्येक विकासकाला त्याचे प्रस्तावित आणि चालू असलेले दोन्ही प्रकल्प महारेरामध्ये नोंदणीकृत करणे आवशयक आहे.

• नोंदणी करतेवेळी, विकासकाने बांधकाम प्रकल्पाबद्ल संपूर्ण माहिती जाहीर करणे आवश्यक आहे.

• बांधकाम प्रकल्पाबद्दलच्या जाहिरातीमध्ये महारेरा विशिष्ट नोंदणी क्रमांक नमूद असणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या तपशिलाची पडताळणी 
 https://maharera.mahaonline.giv.in  
या संकेस्थळावर केली जाऊ शकते.

• विकासकाकडून दिलेले सर्व तपशील महारेराच्या संकेस्थळावर जनतेच्या माहितीकरिता उपलब्ध होतात.

• खरेदीदार विकासकाने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी महारेरा संकेस्थळाला भेट देऊशकतो. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांची माहिती या संकेस्थळावर असेल.

• इच्छुक खरेदीदार ठिकाण किंवा विकासकाचे नाव किंवा सदनिकाचा प्रकार इत्यादिनुसार महारेरा संकेतस्थळावर प्रकल्प शोधू शकतो.

• मंजूर प्रकल्प योजना, आराखडा, इमारत आराखडा, प्रारंभ प्रमाणपत्र, सदनिकांची वैशिष्ट्ये, सोयीसुविधा, विकास कार्याचा आराखाडा , इत्यादी दस्तवेज आणि वाटपपत्रचे स्वरूप, विक्री करारपत्र आणि कन्व्हेयन्स डीड इत्यादी कागद पत्रे इच्छुक खरेदीदार तपासू शकतो.

• खरेदीदाराकडून वसूल केलेल्या रक्कमेपैकी ७०% रक्कम स्वतंत्र प्रकल्प खात्यात जमा करणे आवश्यक आहे. अभियंता, आर्किटेक्ट आणि लेखापाल यांनी प्रमाणित केल्यानंतर ही रक्कम काढता येईल.

• महारेरा च्या तरतुदींचे पालन न केल्यास कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे.

• अधिक माहितीसाठी https://maharera.mahaonline.gov.in

रहिवाशी प्रमाणपत्र थोडक्यात माहिती

रहिवाशी प्रमाणपत्र थोडक्यात माहिती 

काय असते? कुठे मिळते? कशा साठी ?

व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवाशी आहे हे सिध्द करण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जरी व्यक्तीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड ही कागपत्रे राहण्याचे ठिकाण दर्शवत असते तरी रहिवासी प्रमाणपत्र हे रहिवाशी दर्शविणारे प्रमाणित अंतिम प्रमाणपत्र असते. लायनस, नोकरी, संपत्ती, व्यवसाय नोंदणी इत्यादी साठी आवश्यकाता असते.

•रहिवासी प्रमाणपत्र हे केवळ प्रत्येक राज्य तेथील राहणाऱ्या नागरिकांना देते.
•एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यांतील  प्रमाणपत्र काढण्यास पात्र नसतो. तसे करणे कायद्याने गुन्हा ठरतो.


रहिवासी प्रमाणपत्र प्राप्ती साठी आवश्यक कागदपत्रे.

१) तलाठी रहिवासी दाखला.

२) शाळा सोडल्याचा दाखला.

३) रेशन कार्ड झेरॉक्स.

रहिवासी प्रमाण पत्रा मध्ये गावपातळीवर तलाठी यांच्याकडून मिळणारे रहिवासी प्रमाणपत्र. तसेच तहसील कार्यालयाकडून दिले जाणारे
डोमिसाईल/ रहिवासी प्रमाणपत्र व जिल्हाधकारी कार्यालयातून/ मार्फत दिले जाणारे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ही प्रमाणपत्रे आवश्यकते नुसार सादर करता येतात.

केंद्रीय नोकरभरीतीसाठी Maharashtra शासनाच्या नोकरभरती करिता डोमिसाईल certificate आवशयक असते.

मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे.
अधिक माहिती साठी... खालील लिंक वर क्लिक करा.

https://www.mahaonline.gov.in/citizenservices/index

प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY): एक सर्वसमावेशक मार्गदर्शक

  नमस्कार, 'MPSC-मराठी' या आपल्या लाडक्या ब्लॉगवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.   ​तुम्ही MPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची त...