ई - मोजणी प्रणाली
ई- मोजणी उपाधीक्षित भूमीअधिलेख कार्यालयातून तालुका स्तरावर जमीन मोजणीसाठी अर्ज स्वीकारले जातात. अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक्ष मोजणी होईपर्यंत पारंपरिक पद्धतीने कार्यवाही करताना येणाऱ्या अनेक अडचणी लक्ष्यात घेऊन भूमिअभिलेख विभागाने यासाठी राष्ट्रीय सूचना विद्यान केंद्राच्या मदतीने " ई - मोजणी " हि ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे ,
ई - मोजणी प्रणालीत मोजणी प्रक्रियेत निगडित मोजणी शुल्क ठरविणे, प्रत्येक मोजणी अर्जाला संगणकीकृत विभागणी, चलन, नोटीस आणि कार्यारंभ आदेशाची प्रिटिंग तसेच भूमापकाचा दौरा कार्यक्रम इत्यादी कामे केली जातात.
ई- मोजणी प्रणालीत मोजणीसाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरता येतो. त्यानुसार मोजणीच्या अर्जाच्या नोंदीचे रजिष्ट्रेशन कालबाह्य झाले आहे आणि त्याजागी दैनंदिन अहवाल ऑनलाईन तयार होतात .
मोजणीची नोंद झाल्यानंतर मोजणीच्या प्रकारानुसार आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार मोजणीचे शुल्क ठरवले जाते. मोजणीचे शुल्क शासकीय खाती जमा करण्यासाठी ते चालनादरवारे बँकेत भरावयाचे असते या प्रणालीतून शासकीय चलनाची प्रत करण्यात येते .
अर्ज दाखल केल्यानंतर त्या अर्जदाराकच्या जमिनीच्या मोजणीचे काम कोणत्या भू -मापकाकडे द्यायचे हे पूर्वी कार्यालय प्रमुखांकडून ठरवले जात असे, परंतु भूमापकाच्या संख्येनुसार आणि मोजणीच्या नोंदीनुसार मोजणीच्या कामाची विभागणी या प्रणालीद्वारे केली जाते .
एकदा भूमापकाचा दौरा निश्चित झाला कि मग मोजणीच्या संदर्भात असलेल्या इतर खातेदारांना नोटीस दिली जाते . नोंदणी क्रमांक, मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव व त्याचा मोबाईल क्रमांक याची माहिती अर्जदारास तात्काळ ओंलीने प्राप्त होते, तसेच अर्जदारास स मी स द्वारे मोजणीची तारीख दिली जाते .
साकेत स्थळ
महाराष्ट्र शासनाच्या डाटा सेंटरवर स्थापित केलेल्या या प्रणालीच्या संकेतस्थाळाचा पत्ता .
<http://mahabhulekh
No comments:
Post a Comment